Friday, 26 August 2016

'ऐलोवेरा'मुळे होणारे फायदे!


खेड्यापाड्यात जमिनीवर किंवा घराच्या छतावर लटकणारे हा रोप हल्ली सौंदर्यप्रसाधनांत व औषधांमध्ये प्रामुख्याने वापरले जाते. ऐलोवेराच्या पानांमध्ये आर्द्रता साठवण्याची क्षमता असते. याचा रस चेहर्‍याला लावल्याने त्वचेत चमक येते. त्वचा भाजली गेली असेल तरी ऐलोवेराचा रस लावल्याने फायदा होतो. 

ऐलोवेराचे फायदे : 
ऐलोवेराच्या पानांच्या रसात थोड्या प्रमाणात नारळाचे तेल घेऊन कोपरे, गुडघे व टाचांवर लावल्याने त्या जागेवरचा काळेपणा दूर होतो. 
सकाळी उठल्यावर उपाशी पोटी ऐलोवेराच्या पानांचे सेवन केल्याने बद्धकोष्ट दूर होते. 
गुलाबपाण्यात ऐलोवेराचा रस मिसळून त्वचेवर लावल्याने चमक येते. 
ऐलोवेराच्या रसात मुलतानी माती किंवा चंदन पावडर मिसळून लावल्याने त्वचेवर असणारे डाग, फोड दूर होतात.

No comments:

Post a Comment