Friday, 26 August 2016

शिकेकईत असणारे महत्त्वाचे अनेक गूण…

शिकेकई - फ़्रुट फॉर हेअर, म्हणजे केसांचे फळ.

शिकेकई, ह्या औषधी वनस्पतीची मोठ्याप्रमाणात लागवड भारतभरात आणि पूर्व अशियात सापडते. शिकेकईची फळे वाळवून दळून, त्याची पावडर वापरली जाते. किंवा शिकेकईचा ओला पाला पट्यावर वाटून तो केसांसाठी वापरला जातो.


शिकेकईचा केस दणकट व्हायला, तजेलदार व्हायला खूपच मदत होते. ही वनस्पती उष्ण आणि कोरड्या कटिबंधात वाढणारी आहे. केसामधे कोंडा न होण्यासाठी शिकेकईचा खूपच उपयोग होतो. आजच्या युगात आपण इतके साबण शाम्पू विकत घेत असतो, पण शिकेकई हे एक नैसर्गिक बॉडी केअर आणि हेअर केअर प्रॉडक्टच आहे. त्याची सर कोणत्याही शाम्पू कंडिशनरला नाही. शिकेकई मधे नैसर्गिक तेल, नैसर्गिक शाम्पू आणि नैसर्गिक कंडिशनर असते.



WD
शिकेकई मधे खूप प्रमाणात सॅपोनिअन हे रसायन आढळते. सॅपोनियन हे नैसर्गिक द्रव्य आहे. ह्या द्रव्यामुळे फेस निर्माण होतो. त्यामधे स्वच्छतेला हातभार लावतील असे अंश असतात. हे रसायन नंतर साबण उत्पादनासाठी वापरले जाते.


शिकेकईचा वापर उन्हाळ्यात खूपच प्रभावी ठरतो. त्यामुळे डोक्याला एक थंडाई येते. शिकेकईच्या बरोबरीनी नागरमुथा, वाळलेली संत्राची साले, वाळवलेली मेंदीची पाने, ह्या गोष्टीही वाटल्या जातात. शिकेकई वापरायची असल्यास दळून आणलेली शिकेकई आदल्या दिवशी रात्रीच लोखंडाच्या भांड्यात भिजवून ठेवतात. सकाळी नहाण्यापूर्वी ती भांड्यातील शिकेकई उकळून घेतात. म्हणजे त्याचे सर्व सत्व एकजीव होते आणि त्याचा केसांवर खूप छान परिणाम होतो.

रेनी हेअर केअर

उन्हाळ्याच्या दाहानंतर धरतीला पाण्याची जितकी आस लागलेली असते, तितकीच आपल्या त्वचेला असते. उन्हाळ्यात सूर्यकिरणांचे त्वचेवर दुष्परिणाम झालेला असतो. पावसाळ्यातील ढग या किरणांपासून आपले संरक्षण करतात. हवेतील आर्द्रताही वाढलेली असते. त्यामुळे शुष्कपणा जाणवत नाही, तरीही त्वचेची काळजी ही घेतलीच पाहिजे. 

या हवामानात केसांची फार काळजी घ्यावी लागते. पाण्यातील क्लो‍रीनचा डोक्याच्या त्वचेला त्रास होतो. त्याने केस गळू लगातात. विहिराचे किंवा बोअरिंगचे पाणी वापरत असल्यास त्यात क्षारनिर्मलन करणारी 



रसायने घालून मग हलके झालेले पाणी केस धुण्यासाठी वापरावे. अन्यथा क्षार केसांवर बसून केसांचा मुलायमपणा नाहीसा होतो. या सुमारास केस गळू लागले वा राठ झाले, तर केस धुवायला योग्य पाणी वापरून सौम्य शॅम्पूने केस धुवावे व कोणत्याही आम्ल कंडिशनरचा वापर करावा. 

पांढरे व्हिनेगार, थंड पाण्यात अर्धे लिंबू पिळून केलेले पाणी, ताकाच्या व दह्याच्या वरचे पाणी या पदार्थात आम्लात असते. केसांच्या वर साठलेले क्षार यामुळे काढून टाकले जातात व केस मऊ राहून चमकदार होतात.

नॅचरल मॉइश्चयरायजर

पार्लरमध्ये जायला वेळ मिळत नाही.. काळजी का करता.. तुमच्या घरीच तुमच्या त्वचेला सुंदर बनविणारे अनेक पदार्थ उपलब्ध आहेत. त्वचेची सुंदरता आणि कोमलता कायम राखण्यासाठी आपल्या किचनमध्ये अनेक गोष्टी असतात ज्या नॅचरल मॉइश्चिरायजरचं काम करतात. 

मध: त्वचेचं क्लिंन्जिंग करण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे मध.. मधाच्या वापरामुळे त्वचा कोमल बनते आणि उजळतेही. यामुळे चेहरा, हातापायाची चमक कायम राहते.



ताक: ताक तुमच्या त्वचेतून डेड स्किन सेल्स बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते. त्यामुळे तुमची त्वचाही एव्हरयंग दिसते. एक सुती कपडा घेऊन तो थंड ताकात बुडवा आणि या कपड्यानं आपला चेहरा ५ ते १0 मिनिटांपर्यंत झाकून ठेवा.. त्यानंतर थंड पाण्यानं चेहरा धुऊन घ्या.

या तेलाने उगवतात नवे केस

केस गळत आहे, टक्कल पडतंय आणि अनेक उपाय करूनही फायदा मिळत नाहीये तर हे तेल आपल्यासाठी उत्तम पर्याय आहे. याने टक्कल पडलेल्या जागेवरही नवे केस येतील आणि केस दाट होतील. पाहू कसं तयार करायचं हे तेल..

हे तेल तयार करण्यासाठी आपल्याला 5 वस्तूंची गरज आहे ज्या सहजपणे उपलब्ध असतात.

1. लसणाच्या पाकळ्या: 6 ते 7



2. ताजा चिरलेला आवळा: 2 ते 3
3. चिरलेला कांदा: 1 लहान
4. एरंडेल तेल: 3 चमचे
5. नारळाचे तेल: 4 चमचे

'ऐलोवेरा'मुळे होणारे फायदे!


खेड्यापाड्यात जमिनीवर किंवा घराच्या छतावर लटकणारे हा रोप हल्ली सौंदर्यप्रसाधनांत व औषधांमध्ये प्रामुख्याने वापरले जाते. ऐलोवेराच्या पानांमध्ये आर्द्रता साठवण्याची क्षमता असते. याचा रस चेहर्‍याला लावल्याने त्वचेत चमक येते. त्वचा भाजली गेली असेल तरी ऐलोवेराचा रस लावल्याने फायदा होतो. 

ऐलोवेराचे फायदे : 
ऐलोवेराच्या पानांच्या रसात थोड्या प्रमाणात नारळाचे तेल घेऊन कोपरे, गुडघे व टाचांवर लावल्याने त्या जागेवरचा काळेपणा दूर होतो. 
सकाळी उठल्यावर उपाशी पोटी ऐलोवेराच्या पानांचे सेवन केल्याने बद्धकोष्ट दूर होते. 
गुलाबपाण्यात ऐलोवेराचा रस मिसळून त्वचेवर लावल्याने चमक येते. 
ऐलोवेराच्या रसात मुलतानी माती किंवा चंदन पावडर मिसळून लावल्याने त्वचेवर असणारे डाग, फोड दूर होतात.

घनदाट आणि चमकदार केसांसाठी 5 सोपे उपाय



1.  केसांना धूळ, ऊन आणि प्रदूषणापासून वाचवा. यासाठी टोपी, स्कार्फ किंवा हेल्मेट वापरा.  रोज केस खुले सोडू नये.

2. आठवड्यातून दोनदा तरी तेलाची मालीश करावी ज्याने केसांना पोषण मिळेल. आणि केस धुण्याआधी मोकळे सोडावे.

3  दिवसभरात केसांना 3 वेळा विंचरा. कारण केसात गुंता झाल्यावर त्यांची तुटण्याची भीती असते. ज्याने केसांचा दाटपणा कमी होतो. पण ओले केस विंचरू नये. केसांना तुटण्यापासून वाचविण्यासाठी खालील बाजूपासून विंचरायला सुरू करा.

तजेलदार त्वचेसाठी आवश्यक आहे हे व्हिटॅमिन्स...

ड्राय आणि सुरकुतलेल्या त्वचेसाठी आपला आहार जबाबदार आहे. पर्याप्त पोषण मिळाल्यावर आपलीही त्वचा तजेलदार होऊ शकते. तसे तर विभिन्न त्वचेसाठी वेग वेगळ्या आहाराची गरज असते परंतू निरोगी आणि तजेलदार त्वचेसाठी आपल्या आहारात हे व्हिटॅमिन्स असणे गरजेचे आहे. पाहू ग्लोइंग स्किनसाठी आवश्यक व्हिटॅमिन्स...

कंडिशनरचा वापर कसा करावा

* केसांचे सेटिंग करण्यापूर्वी कंडिशनिंग करून घ्यावे. केस अधिक चांगले सेट करता येतात. कंडिशनर केवळ केसांना लावावा. शक्यतोवर टाळूला कंडिशनर लावू नये. 

* कंडिशनिंग करण्यापूर्वी केस व्यवस्थित धुऊन घ्यावेत, म्हणजे केसांवरील डिटर्जंट पूर्णपणे निघून जाईल. 

डैंड्रफपासून नेहमीसाठी सुटकारा मिळवतो एलोवेरा (कोरफड)



ज्याच्या डोक्यात डैंड्रफ असतो त्याला बर्‍याचवेळा आपली मान खाली टाकावी लागते. डोक्यात पांढर्‍या रंगाचा कोंडा प्रत्येकाला दिसून येतो. जर तुमच्या डोक्यात कोंडा आहे आणि तुम्ही हजारो शँपू आणि तेल लावून लावून त्रस्त झाले असाल तर, एलोवेरा ट्राय करा.  

एलोवेरा जेल डोक्याच्या त्वचेला नमी पोहोचवते, ज्यामुळे डोक्यातील ड्रायनेस पूर्णपणे ठीक होण्यास मदत मिळते. कोंडा एक प्रकारचा फंगस फैलवते म्हणून आम्ही तुम्हाला एलोवेरा जेलमध्ये काही वस्तू मिसळायला सांगू जे या फंगसाचा पूर्णपणे सफाया करून देईल.  

एलोवेरा जेलच्या मदतीने तुम्हाला कोंड्यामुळे होणार्‍या खाजेेपासून सुटकारा मिळेल. तर जाणून घेऊ कोंड्याला एलोवेरा जेलच्या मदतीने कसे दूर करू शकता.  

ताजे एलोवेरा जेल   
याला प्रयोग करण्यासाठी एलोवेराच्या झाडापासून 3 चमचे एलोवेरा जेल काढा आणि बोटांनी आपल्या डोक्याच्या स्कलवर लावा. असे केल्याने डोक्याला नमी मिळेल. याने डोक्याची मसाज करा आणि रात्रभर तसेच ठेवा व सकाळी शँपूने डोकं धुऊन घ्या.

काळी मान स्वच्छ करण्यासाठी 3 सोपे उपाय

मान काळी असली तर चेहरा कितीही गोरा आणि आकर्षक असो, सुंदरता फिकी पडते. काही लोकं रोज अंघोळ करताना खूप मान घासतात तरी काही परिणाम हाती लागत नसून मान लाल होऊन जाते. आज आम्ही आपल्याला सांगू असे काही सोपे उपाय ज्याच्या मदतीने आपण काळी मान स्वच्छ करू शकतात. या वस्तू आपल्या सहजपणे घरात उपलब्ध होऊन जातील.. पहा हे सोपे 3 उपाय:

बटाट्याचा रस
बटाट्याच्या रसाने त्वचेचा रंग हलका होतो. कच्चा बटाटा किसून मानेवर लावावा. किंवा किसलेल्या बटाट्याचा रस आणि लिंबाचा रस मिसळून मानेवर 

गूळ खा आणि तजेलदार त्वचा, दाट केस मिळवा

आपल्या रोजच्या आहारात कमी अधिक प्रमाणात साखर असतेच. संशोधनातून असे दिसून आले आहे की साखरेपेक्षाही गूळ आरोग्यासाठी अधिक चांगला आहेच पण गुळाच्या सेवनाने तजेलदार त्वचा आणि भरदार निरोगी, चमकदार केस यांचा लाभ होतो. रोजच्या आहारातून काहीशा उपेक्षित राहिलेल्या गुळामध्ये अँटी ऑक्सिडंट, कॅल्शियम, आयर्न व अन्य अनेक खनिजे आहेत. त्यामुळे त्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात.

त्वचेवर अकाली सुरकुत्या येत असतील तर गुळाच्या सेवनाने हे प्रमाण मंदावते. चेहर्‍यावर मुरूमे पुटकुळ्या यांना अटकाव होतो. गुळात पोटॅशियम आहे व ते 


रीरातील जादा पाणी कमी करते परिणामी वजन घटण्यास त्याचा हातभार लागतो. त्वचेवरील डाग कमी करण्यासही गूळ महत्त्वाची भूमिका बजावतो व त्यामुळे त्वचा तजेलदार दिसते.

गुळात आयर्न म्हणजे लोह विपुल प्रमाणात आहे. त्यामुळे गूळ खाल्ल्याने केस मजबूत व दाट बनतात. शरीरातील विषारी द्रव्ये कमी होतात व त्यामुळे आपोआपच सौंदर्य खुलते. रक्तशुद्धीच्या कामातही गूळ साहाय्यकारी आहे. 

त्यामुळे रक्तदोषामुळे जे ब्यूटी प्रॉब्लेम निर्माण होतात ते दूर केले जातात. त्यामुळे असा हा बहुगुणी गूळ आहारात अवश्य समाविष्ट करावा.

काळी वर्तुळे घालविण्यासाठी सोपा उपाय

अपुरी झोप किंवा रात्री उशीरापर्यंत काम करण्यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे तयार होतात. म्हणून सर्वात आधी आपल्याला आठ तास झोप घेणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त एक सोपा उपाय आहे ज्याने काही दिवसातच आपल्या परिणाम मिळतील. पाहू काय आहे ते...

सामुग्री: काकडी आणि लिंबू
विधी: काकडी किसून त्या अर्ध्या लिंबाचा रस मिसळा. फ्रीजमध्ये गार होण्यासाठी ठेवून द्या. गार झाल्यावर हे गाळून रस काढून घ्या. 

आता हा रस बोटाच्या मदतीने डोळ्याखाली लावा. 15 ते 20 मिनिटाने चेहरा धुऊन टाका. दर दोन दिवसात हे 

घरी तयार करा अँटी एजिंग क्रीम

एका बाऊलमध्ये 2 चमचे बदाम तेल आणि 2 चमचे गुलाब पाणी मिसळा. हे मिश्रण आपल्या चेहर्‍यावर लावून 15 मिनिट राहू द्या. वाळल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका. चेहरा चिकट वाटत असल्यास हलक्या फेसवॉश वापरून चेहरा धू शकता.

तसेच हात सुंदर दिसावे म्हणून दुधाच्या सायीने तयार केलेली क्रीम आणि बदाम तेल सममात्रेत मिसळा. हे मिश्रण हातावर लावल्याने हातांची नैसर्गिक सुंदरता वाढते आणि हात नरम आणि आकर्षक दिसू लागतात.\

लिपस्टिक जास्त वेळ टिकत नाही? तर वाचा हे सोपे उपाय

ओठांवर लिपस्टिक लावल्यावर एक वेगळाच लुक दिसतो. पण कित्येकदा अधिक तास बाहेर राहायचे असेल तेव्हा तयार होताना लावलेली लिपस्टिक डल होते आणि अधून-मधून पुसली जाते. हे खूपच वाईट दिसतं. म्हणून आपण पाहू या असे काही सोपे उपाय ज्याने लिपस्टिक टिकून राहील:

आपले ओठ हेल्थी असतील तर लिपस्टिक अधिक काळपर्यंत टिकून राहते. ओठांना निरंतर स्क्रब करत राहावे. यासाठी टूथब्रशही वापरू शकता. ओठांना बाम लावण्यानेदेखील फायदा होतो.