डँड्रफ म्हणजेच केसातला कोंडा ही जवळपास प्रत्येक महिलेची समस्या आहे. या कोंड्यामुळे डोक्याला खाज सुटतेच पण काळ्या किंवा इतर गडद रंगाच्या कपड्यांवर पडलेला डँड्रफ इतरांच्या नजरेत भरतो. कितीही उपाय केले तरी कोंडा परत येतो. जाहिरातीतले शँपूही काही उपयोगाचे नसतात. ते फक्त डँड्रफ धुतात. हा कोंडा कायमचा घालवण्याचे उपाय तुमच्या स्वयंपाकघरातच आहेत. या स्वस्त आणि मस्त उपायांनी कोंड्याची समस्या कायमची सोडवा.
* अॅपल व्हिनेगर कोंड्यावर फारच गुणचारी आहे. या व्हिनेगारमधल्या आम्लामुळे तुमच्या स्कॅल्पचा पीएच बॅलन्स सांभाळला जातो. यामुळे कोंड्याची वाढ होत नाही. नियमित वापरामुळे कोंडा कायमचा दूर होतो.
* केस ओल करून त्यावर खायचा सोडा चोळा. तुमच्या डोक्याच्या त्वचेवर हा सोडा लागू द्या. त्यानंतर शँपू लावू नका. बेकिंग सोड्यामुळे फंगस कमी होते आणि कोंडाही तयार होत नाही.
* खोबरेल तेलही कोंड्यावर फारच गुणकारी आहे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा खोबरेल तेलाने मसाज करा. दुसर्या दिवशी शँपूने केस धुवा.
* दोन चमचे लिंबाच्या रसाने तुमच्या केसांना मसाज करा आणि पाण्याने केस धुवून टाका. त्यानंतर शँपू लावा. मग कपभर पाण्यात लिंबाचा रस घालून त्या पाण्यानं पुन्हा केस धुवा. तुम्ही केस धुणार असाल तेव्हा ते अशाप्रकारे धुवा. पुन्हा लिंबाचा रस लावल्यानंतर शँपू लावू नका.
* लसूणातही जंतूसंसर्ग बरा करण्याची क्षमता असते. लसणामुळे तुमच्या स्कॅल्पवरचा फंगस नष्ट होतो. म्हणून केस धुण्याआधी लसूण पेस्ट आणि मध यांचं मिश्रण केसांना लावा. कोंड्यापासून नक्कीच आराम मिळेल आणि केस चमकदार होतील.
शिकेकई - फ़्रुट फॉर हेअर, म्हणजे केसांचे फळ.
शिकेकई, ह्या औषधी वनस्पतीची मोठ्याप्रमाणात लागवड भारतभरात आणि पूर्व अशियात सापडते. शिकेकईची फळे वाळवून दळून, त्याची पावडर वापरली जाते. किंवा शिकेकईचा ओला पाला पट्यावर वाटून तो केसांसाठी वापरला जातो.
शिकेकईचा केस दणकट व्हायला, तजेलदार व्हायला खूपच मदत होते. ही वनस्पती उष्ण आणि कोरड्या कटिबंधात वाढणारी आहे. केसामधे कोंडा न होण्यासाठी शिकेकईचा खूपच उपयोग होतो. आजच्या युगात आपण इतके साबण शाम्पू विकत घेत असतो, पण शिकेकई हे एक नैसर्गिक बॉडी केअर आणि हेअर केअर प्रॉडक्टच आहे. त्याची सर कोणत्याही शाम्पू कंडिशनरला नाही. शिकेकई मधे नैसर्गिक तेल, नैसर्गिक शाम्पू आणि नैसर्गिक कंडिशनर असते.
WD
शिकेकई मधे खूप प्रमाणात सॅपोनिअन हे रसायन आढळते. सॅपोनियन हे नैसर्गिक द्रव्य आहे. ह्या द्रव्यामुळे फेस निर्माण होतो. त्यामधे स्वच्छतेला हातभार लावतील असे अंश असतात. हे रसायन नंतर साबण उत्पादनासाठी वापरले जाते.
शिकेकईचा वापर उन्हाळ्यात खूपच प्रभावी ठरतो. त्यामुळे डोक्याला एक थंडाई येते. शिकेकईच्या बरोबरीनी नागरमुथा, वाळलेली संत्राची साले, वाळवलेली मेंदीची पाने, ह्या गोष्टीही वाटल्या जातात. शिकेकई वापरायची असल्यास दळून आणलेली शिकेकई आदल्या दिवशी रात्रीच लोखंडाच्या भांड्यात भिजवून ठेवतात. सकाळी नहाण्यापूर्वी ती भांड्यातील शिकेकई उकळून घेतात. म्हणजे त्याचे सर्व सत्व एकजीव होते आणि त्याचा केसांवर खूप छान परिणाम होतो.
हळद रक्त शुद्ध करते म्हणूनच याने सुंदरता वाढते. चेहर्यावरील डाग जात नसल्यास हळदीचा पॅक तयार करून वापरू शकता. हळदीत आढळणारे एंटीसेप्टिक गुण डाग मिटवण्यात मदत करतात. पाहू हळदीचे काही गुणकारी फेस पॅक ज्याने डागही मिटतात आणि रंगही उजळतो.
हळद आणि दही: 1 चमचा हळद पावडर 1 चमचा दह्यासोबत मिक्स करा आणि ही पेस्ट चेहर्यावर लावा. 15 मिनिटानंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. आठवड्यातून एकदा तरी हे पॅक वापरा. डाग नक्की साफ होतील.
हळद आणि काकडीचा रस: हळद आणि काकडीने त्वचा उजळेल. यासाठी 1 चमचा हळदीत 2 चमचे काकडीचा रस मिसळा आणि चेहर्यावरील डागांवर लावा. पेस्ट वाळल्यावर चेहरा धुऊन टाका. असे आठवड्यातून दोन ते तीन वेळा करा.
कपाळावर टिकली लावली नाही तर भारतीय शृंगार अर्धवट वाटतो असे म्हणायला हरकत नाही. टिकली लावल्यावर परंपरा तर झळकतेच चेहर्यात गोडावाही येतो. आपल्या चेहर्याचा शेपप्रमाणे टिकलीची निवड केल्यास सुंदरता अजूनच वाढते. पहा आपल्या चेहर्यावर कोणत्या शेपची टिकली जमेल ते:
राउंड शेप
गोल चेहर्यावर लांब टिकल्या खूप उठून दिसतात. मोठी गोल टिकली लावणे टाळावे कारण अशात चेहरा अजून लहान दिसतो.
अनेक लोकांना वैक्सिंग करताना खूप वेदना होतात. स्कीवनवरून केस खेचले जातात त्यामुळे वेदना होणे साहजिक आहे. परंतू काही उपाय करून या वेदनांपासून मुक्ती मिळू शकते.
पाळी असताना टाळा
पाळी सुरू असताना आपली त्वचा फार संवेदनशील असते. याव्यतिरिक्त डेट येण्यापूर्वीही वैक्सिंग करणे टाळावे. पाळी संपल्यावर शरीर नार्मल होतो तेव्हा वैक्सिंग करणे योग्य ठरेल.
कॉफी टाळा
ज्या दिवशी वैक्सिंग करवण्याचा प्लान असेल त्या दिवशी कॉफी पिणे टाळा. कॅफिनमुळे त्वचा उत्तेजित होते आणि वैक्सिंग करताना वेदना होतात.
एक्सफोलिएट करा
याने डेड सेल निघून जातात. याने डेड त्वचेच्या आत असणारे केसही निघतात. यामुळे केस खेचल्याने होणार्या वेदना कमी होतात.
गरम पाण्याने अंघोळ
वैक्सिंग करण्यापूर्वी थंड नव्हे तर गरम पाण्याने अंघोळ करावी. याने त्वचेचे रोमक्षिद्र खुलून जातील आणि त्वचा नरम होईल. अधिक वेळ गरम पाण्यात राहण्याने सर्व रोमक्षिद्र खुलतील आणि वैक्सिंगमध्ये सुविधा होईल.
लूज कपडे
वैक्सिंग दरम्यान लूज कपडे घालायला हवे. कारण यानंतर त्वचा काही वेळासाठी संवेदनशील असते. टाइट कपडे घातल्यामुळे खाज सुटणे किंवा इतर काही त्वचेचा त्रास उद्भवू शकतो. वैक्सिंगनंतर नॅचरल फायबरने तयार कपडे घाला ज्याने घाम फुटणार नाही.
केस इतके गळत असतील की केसांमध्ये कंगवा टाकायलादेखील भीती वाटतं असेल तर आम्ही आपली ही भीती दूर करू शकतो. केसांच्या आरोग्यासाठी आवळ्याने तयार केलेले हेअर मास्क योग्य ठरेल. आवळ्याला इंडियन गूस्बेरी म्हटले जातं. आवळा केस गळणे थांबवतं आणि केसांना दाट करण्यात मदत करतं. कोणत्याही भाजीपाले आणि फळांच्या तुलनेत आवळ्यात सर्वात अधिक मात्रेत व्हिटॅमिन आढळतं. ज्याने केसांचे कॉलेजन स्तर वाढतं आणि केस गळणे कमी होतं. आवळ्यात अँटीऑक्सीडेंट भरपूर मात्रेत असतं, म्हणून हे लावल्याने केसांना खूप फायदा होतो. आवळ्याचा रस केसांचा मुळात लावल्याने डेंड्रफची समस्या दूर होते. याने नवीन केसही उगवतात.
आपल्याला जलद परिणाम हवे असल्यास रोज एक उकळलेला आवळा खायला हवा. याव्यतिरिक्त आपण घरी हेअर मास्क तयार करू शकता.
केसांसाठी तेल
एक कप नारळ तेल गरम करून त्यात 4-5 आवळे आणि 5 ते 6 जास्वंदीचे पान टाका. 20 मिनिट उकळी घ्या नंतर गॅस बंद करून थंड होण्यासाठी तसेच राहू द्या. गार झाल्यावर एअर टाइट कंटेनरमध्ये ठेवा. दर दोन दिवसाने याने मालीश करा.
हेअर मास्क
1 चमचा मेथीदाणा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा, सकाळी याची पेस्ट तयार करा. आता या पेस्टमध्ये 1 चमचा आवळा पावडर आणि 1 चमचा दही मिसळा. ही पेस्ट केसांना लावून एक तासासाठी तसेच राहू द्या. नंतर पाण्याने धुऊन टाका.
सध्या सणावाराच्या निमित्ताने घरोघरी आरत्या सुरू असतात. आरतीच्या वेळी कापूर जाळून वातावरण शुद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो.
कापराच्या ज्वलनाने वातावरणात एक प्रकारचा सुगंध पसरतो. याच कापरामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. विशेषत: केसांचे आरोग्य राखताना कापराचा वापर महत्त्वपूर्ण ठरतो.
कापराच्या तेलाने केसांचे आरोग्य चांगले राहतेच त्याचबरोबर कोंडाही कमी होतो. बाजारात कापराचं तेल विकत मिळतंच; पण घरीदेखील ते बनवता येतं. ही प्रक्रिया अगदी साधी आहे. शुद्ध खोबरेल तेलात कापराच्या वड्या टाकाव्यात आणि हवाबंद बाटलीत हे तेल साठवावं. यामुळे कापराचा वास उडून जात नाही. कापराचा सुवास मन शांत करणारा आहे.
कापराच्या तेलाने १५ ते २0 मिनिटे डोक्याला मसाज केल्यास केसांचे आरोग्य सुधारते. या मसाजनंतर गरम पाण्यात भिजवलेला टॉवेल केसांभोवती लपेटावा अथवा केसांवर गरम वाफ घ्यावी. यामुळे तेल केसात मुरण्यास मदत होते. त्यानंतर सौम्य शाम्पूने केस धुवून टाकावेत. कापराची अँलर्जी असू शकते म्हणूनच वापर करण्याआधी चाचणी घ्यावी.